Public App Logo
Profile Picture

IEC HEALTH BULDHANA

@iechealthbuldhana
1525Followers
5Following
प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळखेड ता. देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील आपल्या आरोग्य सेविका (ANM) वर्षाताई नागरे यांच्या मुलीने स्वतः HPV लस घेऊन एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. 
👉 यावरून स्पष्ट होते की ही लस सुरक्षित व प्रभावी आहे.
दिनांक 24/02/2026 रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ उज्वलाताई पाटील यांनी HPV लसीकरणाबाबत आयुष्मान आरोग्य मंदिर मडाखेड अंतर्गत  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडसिंगी येथे लाभार्थ्यांची व पालकांची पालक सभा घेऊन त्यांना लसीचे महत्त्व पटवून दिले
दिनांक 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन प्रा. आ. केंद्र पिंप्री गवळी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रतिज्ञाच्या माध्यमातून सर्व बुलढाणा जिल्हा क्षयरोग मुक्त करू अशी शपथ घेण्यात आली
दिनांक 24/03/2026 रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र बुलढाणा येथे HPV लसिकरण मोहीम बाबतीत जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांनी आशा स्वयंसेविका यांना 14 ते 15 वर्ष आतिल लाभार्थी मुलींना प्रवर्त करण्यासाठी समुपदेश केले
📍बुलढाणा, दि. २४ मार्च २०२६ रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज शिवाजी महाराज सभागृह, बुलढाणा येथे टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण कार्यक्रम मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात सर यांच्या हस्ते संपन्न झाला.
आज आयुष्यमान आरोग्य मंदिर बोरजवळा येथे पालक व किशोरवयीन विद्यार्थिनींमध्ये HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरणाबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले. 
डॉ. शैलेश खंडारे वैद्यकीय अधिकारी
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या १४ वर्ष पूर्ण व १५ वर्षांखालील मुलींना एचपीव्ही लस देऊन त्यांचे भवितव्य सुरक्षित करावे, असे विनम्र आवाहन  शिक्षणाधिकारी माध्यमिक मा. अनिल आकाळ साहेब यांनी केले आहे.
*प्रा. आ. केंद्र रायपूर अंतर्गत उपकेंद्र नांद्राकोळी व  अजिसपुर येथील १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना HPV लसीकरण बाबत मार्गदर्शन करतांना CHO डॉ. कोरडे साहेब  यांनी समुपदेशन करून लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त केले.
*आज दिनांक २० मार्च २०२६ रोजी शिवाजी हायस्कूल रायपूर येथील १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना HPV लसीकरण बाबत डॉ. सरपाते मॅडम वैद्यकिय अधिकारी प्रा आ केंद्र रायपूर यांनी माहिती दिली व लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त केले.
सहाय्यक संचालक (हि व ह), अकोला मा. डॉ. अन्सारी साहेब यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय खामगाव, नांदुरा व मलकापूर येथे भेट देऊन तालुकानिहाय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व HPV लसीकरण बाबत सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
बुलढाणा जिल्हयात दि. 8 मार्च 2026 पासून HPV लसीकरणाला सुरूवात झाली आहे करिता प्रतिबंधाकडे दुर्लक्ष करू नका 
आजच आपल्या मुलींचे एचपिव्ही लसीकरण करुन घ्या
आणि त्यांचे जिवन सुरक्षित करा..
“गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही (HPV) लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या १४ वर्ष पूर्ण व १५ वर्ष आतिल झालेल्या मुलींना ही लस देऊन त्यांचे भवितव्य सुरक्षित करावे,” असे विनम्र आवाहन करतांना
24 मार्च 2026 जागतिक क्षयरोग दिनानिमित्त दिनांक 18/03/2026 रोजी शासकीय नर्सिंग स्कूल बुलढाणा येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर रांगोळी स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती  जिल्हा क्षयरोग अधिकारी मा. डॉ. वर्षा श्रीधर गुट्टे मॅडम.
दिनांक 14/03/2026  रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व कॅम्प वडसिंगी अंतर्गत प्रा. आ. केंद्र मडाखेड येथे घेण्यात आला, यावेळी डॉ. प्रवीणकुमार लहासे, डॉ. शकील सर, आरोग्य सेवक श्री टवलारकार, श्री वानखडे, श्री माठे, श्रीमती देश उपस्थित होते.
दिनांक १४/०३/२६ रोजी *हिरडव* येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. *प्रा आ केंद्र हिरडव*अंतर्गत शिबिरात आरोग्य तपासणी, आभा व आयुष्मान कार्ड वाटप, HPV लसीकरण, सिकल सेल, लेप्रोसि, अनेमीया, ई. बाबत जनजागृती केली
दिनांक 14/03/2026 रोजी धामणगाव बढे ता. मोताळा येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर आयोजीत करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये प्रा.आ.केंद्र धामणगाव बढे अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी आरोग्यविषयक कार्यक्रमाची जनजागृती करण्यात आली.
📍प्रा. आ. केंद्र अंत्रि खेडेकर ता. चिखली अंतर्गत 
गुंजाळा येथील शाळेत विद्यार्थिनी मुलींना HPV लसीकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या माध्यमातून गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
१४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या महाराष्ट्र राज्यातील ९ लाख ८४ हजार मुलींना गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेला दिनांक 8 मार्च पासून सुरूवात...
दिनांक 12/03/2026रोजी जनता विद्यालय सिनगाव जहागीर येथे सिकल सेल सोलुबीलिटी टेस्टिंग कॅम्प घेऊन सिकल सेल आजाराविषयी माहिती सांगण्यात आली.
दिनांक 12/03/2026 रोजी जनता विद्यालय सिनगाव जहागीर येथे सिकल सेल सोलुबीलिटी टेस्टिंग कॅम्प घेऊन उपस्थितांना सिकल सेल आजाराविषयी माहिती सांगण्यात आली.
दिनांक 12/03/2026 रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर डिग्रस बु. येथे सिकल सेल सोलुबीलिटी टेस्टिंग कॅम्प घेऊन उपस्थितांना सिकल सेल आजाराविषयी माहिती देण्यात आली व जनजागृति करण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा सरपाते प्राथमिक आरोग्य केंद्र रायपुर तालुका बुलढाणा यांनी मुलीच्या आरोग्य संरक्षणासाठी HPV लसीकरण करून घ्यावे असे आवाहन 14 वर्ष पूर्ण 15 वर्ष आतिल मुलींनी यावेळी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र जळंब अंतर्गत एन.एम.जी. स्कूल, जळंब येथे एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत वै. अ. डॉ. नेहा अग्रवाल यांनी विद्यार्थिनी मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावापासून HPV लसीचे महत्व समजावून सांगितले.
नर्मदा विद्यालय, मंगरूळ (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथे एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत विद्यार्थिनींचे समुपदेशन करण्यात आले.
यावेळी 14 वर्ष पूर्ण व पंधरा वर्षे आतील मुलींनी HPV लसीकरण करून घ्यावे याबाबत जनजागृती करण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या १४ वर्ष पूर्ण व १५ वर्षांखालील मुलींना HPV ही लस देऊन त्यांचे आरोग्य व भवितव्य सुरक्षित करावे,” असे आवाहन महिला बालकल्याण विभाग अधिकारी मा. प्रमोद येंडोले यांनी केले: