सहाय्यक संचालक (हि व ह), अकोला मा. डॉ. अन्सारी साहेब यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय खामगाव, नांदुरा व मलकापूर येथे भेट देऊन तालुकानिहाय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व HPV लसीकरण बाबत सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
385 views | Buldana, Buldhana | Mar 22, 2026 बुलढाणा: सहाय्यक संचालक (हिवताप) अकोला मा. डॉ. अन्सारी साहेब यांनी दिनांक 17/03/2026 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय खामगाव, नांदुरा व मलकापूर येथे भेट देऊन तालुकानिहाय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व HPV लसीकरण बाबत सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच दिनांक 18/03/2026 रोजी जिल्हा हिवताप कार्यालय, बुलढाणा येथे कार्यालय पाहणी करून तांत्रिक, आस्थापना व लेखा बाबींची तपासणी केली. यावेळी प्र. वै. अ, आ. नि. व शहरी भागातील आरोग्य सेवक यांची आढावा सभा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले.