दिनांक 14/03/2026 रोजी धामणगाव बढे ता. मोताळा येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर आयोजीत करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये प्रा.आ.केंद्र धामणगाव बढे अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी आरोग्यविषयक कार्यक्रमाची जनजागृती करण्यात आली.
353 views | Buldana, Buldhana | Mar 20, 2026 धामणगाव बडे:दिनांक 14/03/2026 रोजी धामणगाव बढे ता.मोताळा जि.बुलढाणा येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर आयोजीत करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये प्रा.आ.केंद्र धामणगाव बढे अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रमाची जनजागृती ,आयुष्मान भारत कार्ड वितरण तसेच वय वंदना कार्ड ekyc तसेच HPV लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली.सदर शिबिरास मा.तालुका आरोग्य अधिकारी मोताळा डॉ. निलेश जाधव , वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुर घोती, सर्व समुदाय अधिकारी, HA, LHV, LSO, ANM, MPW व आशा स्वयंसेविका उपस्थित होते