कामठी: नवीन कामठी व जुनी कामठीत संयुक्त दंगा नियंत्रण प्रशिक्षण संपन्न; आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा बडगा
Kamptee, Nagpur | Sep 15, 2026 आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज पोलीस ठाणे नवीन कामठी आणि जुनी कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने लश्करे ईदगाह मैदान, नवीन कामठी येथे दंगा नियंत्रण प्रशिक्षण व प्रात्यक्षिक पार पडले. परिषदेचे पोलीस उपआयुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामठी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रशिक्षण घेण्यात आले.