कामठी: कामठीत जुन्या वादातून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Kamptee, Nagpur | Feb 12, 2026 जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी एका २१ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.