कामठी: रहिवासी भागात मोबाईल टॉवर उभारणीला विरोध; देण्यात आले निवेदन
Kamptee, Nagpur | Feb 17, 2026 कामठी येथील 'मोदी पडाव' परिसरात एका खाजगी घरावर अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारला जात असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या कामामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या, विशेषतः बी.पी. आणि शुगरच्या रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.कामठी शहर काँग्रेस सेवादल आणि स्थानिक रहिवाशांनी या विरोधात नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.