कामठी: नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रात सत्कार
Kamptee, Nagpur | Feb 15, 2026 प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, रनाळा येथे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने कामठी नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अजय अग्रवाल, येरखेडा नगरपंचायत अध्यक्ष राजकिरण बर्वे आणि इतर नगरसेवकांचा राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रेमलता दीदींच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.