कामठी: कामठीत तलवार दाखवून जबरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बेड्या; नवीन कामठी पोलिसांची धडक कारवाई
Kamptee, Nagpur | Oct 26, 2026 .चौधरी हॉस्पिटलसमोरील आंबेडकर पुतळ्याजवळ तलवार दाखवून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन सराईत आरोपींना नवीन कामठी पोलिसांनी गजाआड केले आहे. ही कारवाई सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.आकाश कचरूजी हाटे आणि आकाश मातादीन बरसे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी आरोपींकडून एक लोखंडी तलवार,विना क्रमांकाची इलेक्ट्रिक रिक्षा आणि एक रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण ६०,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.