काटोल: काटोल तालुक्यात मोठी दुर्दैवी घटना: गौरी विसर्जनादरम्यान तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
Katol, Nagpur | Sep 15, 2026 उत्सवाचा आणि आनंदाचा सण कुटुंबावर कसा वज्राघात करू शकतो, याचे अत्यंत हृदयद्रावक उदाहरण काटोल तालुक्यातील झिल्पा गावात घडले आहे. गौरी विसर्जनासाठी आईसोबत तलावावर गेलेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना आज घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण झिल्पा गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आज गौरी विसर्जनाचा कार्यक्रम होता. याच विधीसाठी परिसरातील महिला झिल्पा गावालगत असलेल्या तलावावर गेल्या होत्या .