कामठी: नवीन कामठीत गोवंश कत्तलीसाठी कोंडून ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; ८ जनावरे जप्त
Kamptee, Nagpur | Oct 25, 2026 नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवडी जवळील कनाल परिसरामध्ये गोवंशीय जनावरांना निर्दयीपणे व कुरपणे कत्तलीसाठी कोंडून ठेवणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलिसांनी यशपाल शर्मा यांच्या शेताजवळ छापा टाकला. या कारवाईदरम्यान, कत्तलीसाठी अत्यंत निर्दयीपणे दाटीवाटीने व चारापाण्याशिवाय बांधून ठेवलेली एकूण ०८ लहान-मोठी गोवंशीय जनावरे आढळून आली