कामठी: कामठी तालुक्यात बिबट्याची दहशत: बिना संगम शिवारात वासराची शिकार, बिबट्याला जेरबंद करण्याची गावकऱ्यांची मागणी
Kamptee, Nagpur | Sep 14, 2026 कामठी तालुक्यातील बिना संगम शिवार येथील नासिर शेख यांच्या शेतात बिबट्याने पुन्हा एकदा जनावराची शिकार केली आहे. शेतातील गोठ्यात बांधलेल्या एका वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या परिसरात बिबट्याचा वावर आणि हल्ल्याची ही सलग तिसरी घटना असून, त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत व संतापाचे वातावरण आहे.या सतत घडणाऱ्या घटनांमुळे ग्रामस्थांनी कामठी वनविभाग आणि बिना संगम ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.