रामटेक: पथरई येथे 13 वर्षीय विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या; आईने 20 रुपये मागण्याचे कारण विचारणे बनले कारण
Ramtek, Nagpur | Oct 14, 2026 शाळेत जाताना मुलाने आईला 20 रुपये मागितले. आईने पैसे न देता 20 रुपये कशाला पाहिजेत अशी विचारणा मुलाला केली. यावरून नाराज झालेल्या 13 वर्षीय विद्यार्थ्यांने शाळेत न जाता शिवारात जाऊन एका शेतातील चिंचेच्या झाडाला दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची मनाला पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना तेरा ऑक्टोंबर ला दुपारी घडली. मृतकाचे नाव नैतिक संजय दशमरे असे असून तो आठव्या वर्गाचा विद्यार्थी होता.