गांधी चौक रामटेक येथे फ्रेंड्स फोरेवर महिला ग्रुप ने स्मृतिदिनी केले शहीद अक्षय यास सांस्कृतिक कार्यक्रमातून अभिवादन
Ramtek, Nagpur | Nov 14, 2026 फ्रेंड्स फोरेवर महिला ग्रुप रामटेकच्या विद्यमाने गांधी चौक रामटेक येथे आयोजित एका श्रद्धांजलीपर कार्यक्रमातून शहीद अक्षय भिलकर यास श्रद्धांजली देऊन अभिवादन केले. या निमित्ताने सामूहिक श्रद्धांजलीपर कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.यावेळी सेवानिवृत्त सैनिकांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची अध्यक्षता माजी सैनिक राजेश कोल्हे यांनी केली तर सेवानिवृत्त सैनिक निशार अली सय्यद, सत्यदेव राय, अनिल घोडेस्वार,मनोज सत्यदेव राय, अतुल बसेने, राजेंद्र बिसन, प्रवीण सरगर प्रमुख सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख आतिथी म्हणून नगराध्यक्ष बीकेंद्र महाजन, राका चे जिल्हाप्रमुख राजेभाऊ टाकसाळे, कांचनमाला माकडे, मोरेश्वर माकडे, सय्यद हसरत अली, डॉ. मंजुषा सेलोकर, माजी नगराध्यक्ष सौ माधुरी उईके, शहीद अक्षय चे वडील अशोक भिलकर, आई सरिताताई भिलकर, डॉ. ओमप्रकाश अष्टनकर प्रामुख्याने उपस्थित होते.