गुरुकुल नगर शितलवाडी येथे घरगुती सिलेंडरचा भडका; थोडक्यात बचावल्या 2 मुली
Ramtek, Nagpur | Nov 7, 2026 रामटेक शहरात जवळील ग्रामपंचायत शितलवाडी अंतर्गत येणाऱ्या गुरुकुल नगर निवासी तथा माजी उपसरपंच विनोद सावरकर यांच्या घरी दिवाळी फराळाचे साहित्य बनविताना उपयोगात येत असलेल्या घरगुती गॅस सिलेंडरचा अचानक भडका उडाला. यात वंशिका सावरकर वय 17 वर्षे व ओजस्वी सावरकर वय 13वर्षे या विनोद सावरकर यांच्या दोन मुलींनी जखमी झाल्या.