उमरेड: खासगी कार्यालयात नेऊन तरुणीवर जबरदस्तीचा प्रयत्न; उमरेडमधील घटना
Umred, Nagpur | Sep 14, 2026 उमरेड येथे आईने घरी सोडण्यास सांगितल्याचा बहाणा करून स्कुटीवर बसवून एका १८ वर्षीय तरुणीला खासगी कार्यालयात नेण्यात आले. रवी राऊत असे आरोपीचे नाव असून, त्याने प्रेमाची भाषा करत तरुणीवर जबरदस्तीचा प्रयत्न केला.पिडीत तरुणीने प्रसंगावधान राखून केलेल्या आरडाओरडामुळे नागरिकांनी धाव घेतली, ज्यामुळे तिची सुटका झाली. पिडीतेच्या तक्रारीवरून उमरेड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बीएनएस कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.