रामटेक: आसोली येथे शॉर्ट सर्किट मुळे घराला आग; घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक
Ramtek, Nagpur | Oct 25, 2026 रामटेक तालुक्यातील आसोली येथे शॉर्टसर्किटमुळे एका गरीब कुटुंबाच्या घराला लागलेल्या आगीत घरातील जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाल्याची घटना पंचेवीस ऑक्टोबरला सायंकाळी घडली. यात जवळपास चार लाख रुपयाचे नुकसान झाल्याची पिडीत रवींद्र सुरेश हटवार कुटुंबाने सांगितले. दरम्यान ग्राम महसूल अधिकारी कांचन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठविणार असल्याचे सांगितले.