रामटेक: डिगी मैदान मानापुर (रामटेक) येथे गडमंदिर श्रीराम सेनेने केला रावण वध
Ramtek, Nagpur | Oct 20, 2026 दसऱ्याच्या पर्वावर रामटेक जवळील मानापुर येथील डिगी मैदान परिसरात प्रति वर्षानुसार यावर्षीही रावण वधाचा कार्यक्रम परंपरेनुसार संपन्न झाला. मंगळवार दिनांक 20 सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान श्रीराम मंदिर रामटेक येथून निघालेल्या श्रीराममाच्या 'निशान' अर्थात श्रीराम सेनेने मातीने बनवलेल्या रावणाच्या मूर्तीचे शीर धडा वेगळे केले. यानंतर त्याच मूर्ती मागे बनविलेल्या सूर्पणकाचाही वध करण्यात आला.