रामटेक: नागपूर पदवीधर मतदार संघ निवडणुकीत रामटेक तालुक्यात १६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
Ramtek, Nagpur | Oct 23, 2026 शुक्रवार दिनांक 23 ऑक्टोबरला झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत रामटेक तालुक्यातील एकूण 2489 पैकी 1647 मतदारांनी तहसील कार्यालय रामटेक येथील 3 व रामटेक तालुक्यातील पवनी येथील एका केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला. यात 1006 पुरुष व 641 महिला मतदारांचा समावेश आहे.