🚨 जळगाव पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी! भोकर SBI बँक दरोडा अवघ्या काही तासांत उघडकीस; ३६.४८ कोटींचा मुद्देमाल हस्तगत! 🚔
भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेवर झालेला सशस्त्र दरोडा जळगाव जिल्हा पोलिसांनी सतर्क नागरिकांच्या मोलाच्या सहकार्याने अवघ्या काही तासांत उघडकीस आणला. या कारवाईत ४ सराईत आरोपींना अटक करून तब्बल ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या कारवाईत सुमारे २७ किलो सोने (८७१ बॅग), १२ लाख २६ हजार ५०० रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.
मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक व कौतुकास्पद कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.
या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत पाटील, धरणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी API श्री. नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत गायकवाड, बडगुजर, जितेंद्र वलटे, स.फौ. अतुल वंजारी तसेच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे ASI सुनील पाटील, HC प्रदीप राजपूत, प्रवीण पाटील, दीपक चौधरी, दिनेश चव्हाण, नरेंद्र पाटील, आशीष चौधरी, गुलाब माळी, PC प्रवीण कोळी, प्रशांत ठाकूर, मिलिंद सपकाळे, दीपक देवरे, गणेश पाटील, तुषार जोशी, चालक अशोक पाटील, बापू कोळी व त्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
तसेच धरणगाव पोलीस ठाण्याचे HC सत्यवान पवार, PC मनोज पाटील आणि ग्रामस्थ सागर कोळी, भगवान कोळी, चेतन पाटील व बन्सी पाटील यांनीही मोलाचे सहकार्य केले.
वेगवान तपास, अचूक नियोजन, प्रभावी नाकाबंदी आणि पोलीस व नागरिकांमधील समन्वय यांचे हे उत्तम उदाहरण!
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या या उल्लेखनीय कामगिरीला सलाम! सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 👏🚔
#JalgaonPolice #MaharashtraPolice #Jalgaon #PoliceAction #SBIRobbery #CrimeDetection #JalgaonPoliceSuccess #ProudOfJalgaonPolice
4.7k views | Jalgaon, Maharashtra | Nov 2, 2026