पोलीस भरतीच्या स्वप्नांना मिळाले बळ! पारोळ्यात युवक-युवतींना मार्गदर्शनाचा प्रेरणादायी उपक्रम!
📍 पारोळा | दि. ०५ नोव्हेंबर २०२६
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या शिबिराच्या माध्यमातून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना मैदानी चाचणी, लेखी परीक्षा तसेच भरती प्रक्रियेतील आवश्यक बाबींबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले मा. आमदार श्री. ॲड. अमोलदादा चिमणराव पाटील यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत पोलीस भरतीचे महत्त्व समजावून सांगितले व मेहनत, जिद्द आणि शिस्तीच्या जोरावर यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहित केले.
याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील, पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दीपक पाटील तसेच एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील पवार उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गुणवंत युवक-युवतींना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन त्यांच्या पोलीस दलातील भरतीच्या स्वप्नांना बळ देण्याचा जळगाव जिल्हा पोलीस दलाचा हा स्तुत्य उपक्रम!
🚔 जळगाव पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर!
93 views | Jalgaon, Maharashtra | Nov 6, 2026