युवकांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी जळगाव पोलीस दलाचा पुढाकार; पोलीस भरतीसाठी मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण!
📍 जामनेर | दि. ०६ नोव्हेंबर २०२६
पोलीस अधीक्षक श्रीकांत यशवंत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या शिबिरात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेबाबत मोलाचे मार्गदर्शन करून त्यांना यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राज्याचे मंत्री मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी उमेदवारांना पोलीस भरतीचे महत्त्व, भरती प्रक्रियेतील विविध टप्पे, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, आवश्यक कागदपत्रे तसेच तयारी करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मेहनत, जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर यश संपादन करण्याचा मौलिक संदेशही त्यांनी दिला.
जळगाव जिल्हा पोलीस दलाचा हा उपक्रम ग्रामीण व शहरी भागातील होतकरू, गुणवंत आणि पात्र उमेदवारांना योग्य दिशा देणारा ठरत आहे. या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून उमेदवारांना मैदानी व लेखी परीक्षेचे तज्ज्ञ मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष सरावाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना निश्चितच याचा लाभ होणार आहे.
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा श्री. बापू रोहम, जामनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. निवृत्ती बोऱ्हाडे, तसेच पोलीस अधिकारी, अंमलदार आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उमेदवार उपस्थित होते.
स्वप्नांना बळ, मेहनतीला दिशा… पोलीस भरतीच्या ध्येयपूर्तीसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाचा पुढाकार!
🚔 जळगाव पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर!
#JalgaonPolice #PoliceRecruitment #PoliceTrainingCamp #Jalgaon #जळगावपोलीस #पोलीसभरती #प्रशिक्षणशिबिर
Jalgaon, Maharashtra | Nov 7, 2026