🚔 *भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला आधुनिकतेचा नवा साज!*
पोलीस स्टेशनच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या सुसज्ज प्रभारी अधिकारी कक्षाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक *श्रीकांत धिवरे* यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक सक्षम करण्यासोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्तम कार्यपरिसर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक *संदीप गावित, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी **केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक **राहुल वाघ, भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक **महेश गायकवाड, तसेच तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी शिकाऊ उपविभागीय पोलीस अधिकारी **प्रशांत दरेकर* यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*सुसज्ज पायाभूत सुविधा, आधुनिक कार्यपरिसर आणि जनसेवेचा दृढ संकल्प… याच दिशेने जळगाव जिल्हा पोलीस दलाची वाटचाल!*
🚔 *जळगाव पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर!*
#JalgaonPolice #BhusawalPolice #MaharashtraPolice #Jalgaon #PoliceDepartment
1.4k views | Jalgaon, Maharashtra | Nov 4, 2026