Public App Logo
Profile Picture

जळगाव पोलीस

@jalgaonpolice
339Followers
0Following
🌺 गणेशोत्सव आनंदाचा… पण सुरक्षिततेची जबाबदारीही आपलीच! 🙏🚩

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत यशवंत धिवरे यांनी गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देत शांतता, सामाजिक सलोखा आणि सुरक्षिततेचे आवाहन केले आहे.

🚫 आक्षेपार्ह गाणी, स्टेटस अथवा सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणारे कोणतेही आक्षेपार्ह कंटेन्ट प्रसारित करू नये.

🔊 न्यायालय व कायद्याने निर्धारित केलेली ध्वनीमर्यादा ओलांडू नये.

🌿 गणेशोत्सव पर्यावरणपूरक, शांततापूर्ण आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करावा.
Video 1
Video 2
Video 3
Video 4
Video 5
Video 6
Video 7
Video 8
Video 9
🚔 कर्तव्य, अधिकार अन् जबाबदारीचा महासंवाद! | ‘पोलीस पाटील मेळावा’ उत्साहात संपन्न
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा पोलिसांच्या वतीने आयोजित ‘पोलीस पाटील मेळाव्या’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
📘 ‘पोलीस पाटील मार्गदर्शिका’चे प्रकाशन यावेळी करण्यात आले. गावपातळीवरील पोलीस प्रशासन आणि नागरिकांमधील दुवा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.
जळगाव जिल्हा पोलीस — जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर! 🚔💙
🌾 बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌾

📍शेतकऱ्यांच्या पाठीशी जळगाव पोलीस सदैव! 🚔

बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या पशुधनाची काळजी घ्या.
बैल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यास, गुरांची संशयास्पद वाहतूक आढळल्यास किंवा कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ डायल 112 वर संपर्क साधा.
आपली सतर्कता आणि पोलिसांची तत्परता यामुळे शेतकरी, पशुधन आणि गावाची सुरक्षा अधिक मजबूत होईल.

सण उत्साहात साजरा करा, मात्र सतर्क राहा!
सर्जा-राजाला मानाचा मुजरा!
पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पोलीस अधीक्षक मा. श्री. श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते प्रबंधक शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
या नव्या शाखेमुळे कार्यालयीन कामकाज अधिक सुसूत्र, गतिमान आणि प्रभावी होण्यास मदत होणार आहे...
👮‍♂️ जळगाव जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतपेढी लि. — १०५ वर्षांची गौरवशाली वाटचाल! 🏆

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतपेढी लि.च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. 💐
विश्वास • आर्थिक आधार • सभासदांचे हित • प्रगतीची वाटचाल 🤝
<nis:link nis:type=tag nis:id=jalgaonpolice nis:value=JalgaonPolice nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=policeemployees nis:value=PoliceEmployees nis:enabled=true nis:link/>
 <nis:link nis:type=tag nis:id=cooperativecreditsociety nis:value=CooperativeCreditSociety nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=Jalgaon nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=annualgeneralmeeting nis:value=AnnualGeneralMeeting nis:enabled=true nis:link/>
 <nis:link nis:type=tag nis:id=achievement nis:value=Achievement nis:enabled=true nis:link/>
 <nis:link nis:type=tag nis:id=proudmoment nis:value=ProudMoment nis:enabled=true nis:link/>
जळगाव LCB व MIDC पोलिसांची मोठी कारवाई! 🚨
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.
अमली पदार्थांची तस्करी व विक्रीविरोधात राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत LCB व MIDC पोलिसांच्या संयुक्त पथकाने ₹11,17,200/- किमतीचा अमली पदार्थ जप्त केला.
या कारवाईत 1 किलो 963 ग्रॅम एफेड्रिन (Ephedrine), 2 किलो 114 ग्रॅम गांजा तसेच इतर मुद्देमाल असा एकूण 4 किलो 77 ग्रॅम मुद्देमाल जप्त करण्यात आला.
🚔 अमली पदार्थांविरोधात जळगाव पोलिसांची धडक कारवाई सुरूच!
🚔 जळगाव पोलिसांचा ‘Mission RISE X’ उपक्रम! 🚔

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे Mission RISE ‘X’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 अमली पदार्थमुक्त जळगावच्या संकल्पासाठी पोलिसांचा पुढाकार!
💙 भटके विमुक्त समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाची साथ!
‘भटके विमुक्त दिवस’ निमित्त जळगाव पोलीस दलातर्फे भटके विमुक्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुस्तके भेट देण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमातून शिक्षणाची कास धरा, व्यसन व गुन्हेगारीपासून दूर राहा आणि आत्मविश्वासाने पुढे चला, असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
इतिहासाच्या वेदनेतून शिक्षणाच्या प्रकाशाकडे… उज्ज्वल भविष्यासाठी एक नवी वाटचाल! 📚✨
जळगाव पोलीस — सदैव आपल्या सेवेत तत्पर! 👮‍♂️💙
🪢 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🪢

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि संरक्षणाची भावना सदैव कायम राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा. 💐
पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे व जळगाव पोलीस परिवारातर्फे सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💙👮‍♂️

“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय”
आपली सुरक्षा, आमची जबाबदारी. 🇮🇳
🌱 जळगाव पोलीस दलाचा हरित उपक्रम! 🌿
जळगाव जिल्हा पोलीस दल व मॅरिको लिमिटेड, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम पोलीस अधीक्षक मा. श्रीकांत धिवरे (भा.पो.से.) यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. 🌳👮‍♂️
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यात आले. ‘हरित जळगाव… समृद्ध जळगाव!’ या संकल्पनेतून हरित आणि सुंदर जळगावच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.
🌱 झाडे लावा… पर्यावरण वाचवा… भविष्य घडवा! 🌳
🚨 सायबर गुन्ह्यांपासून सावध रहा! 📱🔐

एका चुकीच्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा… ⚠️
OTP, PIN, Password किंवा Bank Details कोणालाही शेअर करू नका.

सायबर फसवणूक टाळा, सतर्क राहा आणि इतरांनाही जागरूक करा. 👮‍♂️💻

🇮🇳 सतर्क नागरिक — सुरक्षित समाज!

जळगाव जिल्हा पोलीस...
पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलिसांकडून ‘Mission RISE – Drug Free Jalgaon’ हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 
युवक-युवतींमध्ये अमली पदार्थांविषयी जनजागृती निर्माण करणे, व्यसनापासून दूर राहण्यासाठी सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणे आणि नशामुक्त जळगावासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढविणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
या अभियानांतर्गत डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
👮‍♂️ पोलीस विभाग
🏥 वैद्यकीय क्षेत्र
🎓 विद्यार्थी व युवक
🤝 समाजातील विविध घटक
यांच्या सहभागातून नशामुक्त जळगावाचा संकल्प!
🇮🇳 MISSION RISE – DRUG FREE JALGAON
 एकत्र येऊया… नशामुक्त जळगाव घडवूया!
🇮🇳 स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण 🇮🇳
पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.
- जळगाव पोलीस
📍जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्याकडून सर्व जळगावकरांना १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

आपला राष्ट्रध्वज 'तिरंगा' हा आपला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या या राष्ट्रीय सणादिवशी आपल्या तिरंग्याचा कुठेही अपमान होणार नाही आणि त्याचे पावित्र्य राखले जाईल, याची सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जळगाव पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

जय हिंद! जय भारत! 🇮🇳

- जळगाव जिल्हा पोलीस दल..
पोलीस अधीक्षक मा. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ येथे महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ सज्ज, तर युवकांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ‘RISE मिशन’ अंतर्गत विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. 🚔👮‍♀️

नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच Anti-Drug चित्रकला स्पर्धेतील उत्कृष्ट १५ विद्यार्थ्यांचा बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. 🎨🏆

महिला सुरक्षा आणि ड्रग्समुक्त, सुरक्षित व सक्षम जळगाव यासाठी जळगाव पोलीस दलाचा सातत्यपूर्ण प्रयत्न! 

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaonpolice nis:value=jalgaonpolice nis:enabled=true nis:link/>
 <nis:link nis:type=tag nis:id=bhusawalpolice nis:value=BhusawalPolice nis:enabled=true nis:link/>
 <nis:link nis:type=tag nis:id=daminipathak nis:value=DaminiPathak nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=missionrisex nis:value=MissionRISEX nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=rise nis:value=RISE nis:enabled=true nis:link/>
 <nis:link nis:type=tag nis:id=drugfreejalgaon nis:value=DrugFreeJalgaon nis:enabled=true nis:link/>
 <nis:link nis:type=tag nis:id=womensafety nis:value=WomenSafety nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=antidrugcampaign nis:value=AntiDrugCampaign nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=jalgaonpolicedal nis:value=JalgaonPoliceDal nis:enabled=true nis:link/>
🚨 एकच नंबर — 112! 🚨

पोलीस मदत हवी असेल, 🚔
रुग्णवाहिका हवी असेल, 🚑
किंवा आग लागली असेल, 🔥🚒

आपत्कालीन परिस्थितीत घाबरू नका…
फक्त 112 वर कॉल करा! 📞

तुमचा एक कॉल… कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतो. ❤️

लक्षात ठेवा — पोलीस | Ambulance | Fire Brigade = 112

<nis:link nis:type=tag nis:id=112 nis:value=112 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=emergencynumber nis:value=EmergencyNumber nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonpolice nis:value=JalgaonPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=police nis:value=Police nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ambulance nis:value=Ambulance nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=firebrigade nis:value=FireBrigade nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=publicawareness nis:value=PublicAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safetyfirst nis:value=SafetyFirst nis:enabled=true nis:link/> # जनजागृती <nis:link nis:type=tag nis:id=आपत्कालीनसेवा nis:value=आपत्कालीनसेवा nis:enabled=true nis:link/>