🚔 स्वप्नांना बळ, मेहनतीला दिशा… पोलीस भरतीची नवी आशा!
📍 अमळनेर | जळगाव जिल्हा
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात खासदार मा. स्मिताताई वाघ आणि आमदार मा. अनिलदादा पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देत लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, आवश्यक कागदपत्रे आणि भरतीच्या विविध टप्प्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, अमळनेरचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तरुणांच्या पोलीस दलात भरती होण्याच्या स्वप्नांना योग्य दिशा आणि तयारीला बळ देण्याचा जळगाव जिल्हा पोलीस दलाचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम!
आजची मेहनत… उद्याची खाकी वर्दी! 🇮🇳
जळगाव जिल्हा पोलीस दल – सदैव आपल्या सेवेत तत्पर!
#JalgaonPolice #PoliceRecruitment #Amalner #PoliceTraining #जळगावपोलीस #पोलीसभरती
4 views | Jalgaon, Maharashtra | Nov 5, 2026