संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे ज्योर्तीविज्ञान कार्यशाळा संपन्न
Ramtek, Nagpur | Oct 27, 2026 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे सत्तावीस ऑक्टोबरला वेदांग ज्योतिष्य विभागाद्वारे 21दिवसीय ज्योर्तीविज्ञान कार्यशाळेचे समापन करण्यात आले. यावेळी अध्यक्षता करताना कुलगुरू डॉ. अतुल वैद्य म्हणाले की भारतीय कालगणना ही संशोधकांसाठी पर्वणी ठरली आहे. समारोप सत्राला प्रमुख अतिथी म्हणून श्रीलंकेचे कॅप्टन हर्ष कोरेलाची उपस्थित होते.व्यासपीठावर कुलसचिव डॉ. रोशन अलोणे, अधिष्ठाता प्रो. ललिता चद्रांत्रे, प्रा. कविता होले, प्रा. हरे कृष्ण अगस्ती आणि संयोजक प्रो. प्रसाद गोखले यांची विशेषत्वाने उपस्थिती होती. ही कार्यशाळात 55 विद्यार्थ्यांनी पूर्ण केली.