रामटेक: पदवीधर मतदार संघाची निवडणूक जिंकायची असेल तर एक अधिक एक अकरा करा; पालकमंत्री बावनकुळे यांचे रामटेक येथे आवाहन
Ramtek, Nagpur | Oct 18, 2026 तुमच्या निवडणुकीच्या वेळी पक्षाने सर्वतोपरी मदत केली. आता तुमची वेळ आहे. साध्या गणितात एक अधिक एक दोन होतात. परंतु ही निवडणूक जिंकून सिकंदर व्हायचे असेल तर सर्वांनी एक अधिक एक अकरा करावे. अर्थात भरपूर मेहनत घ्यावी. असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार दिनांक 18 ऑक्टोबरला आनंदी सभागृह रामटेक येथे उपस्थित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, मतदार,कार्यकर्ते यांना केले.