मारेगाव: पोलीस असल्याची बतावणी करून मारहाण करत मागितली खंडणी तिघांना अटक लाखापूर येथील घटना
मारेगाव तालुक्यात पोलीस असल्याची खोटी ओळख देत सर्वसामान्य नागरिकाला बेदम मारहाण करीत खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या एका तासात मारेगाव पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून तीन तोतया पोलिसांना अटक करत मोठा गुन्हा उधळून लावला आहे.