मारेगाव: पोलीस वर्धापन दिनानिमित्त मारेगाव पोलीस स्टेशन येथे जनजागृती उपक्रम,विद्यार्थ्यांना पोलीस कार्यप्रणाली,कायद्यांची माहिती
पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून मारेगाव पोलीस स्टेशन, जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने समाजप्रबोधन व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, मारेगाव येथील विद्यार्थ्यांना पोलीसांच्या दैनंदिन कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.