माणुसकीला लाजवेल अशी एक संतापजनक घटना मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. एका सिकलसेल पीडित अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत, गावातीलच एका विवाहित नराधमाने तिच्यावर वारंवार अत्याचार केले आणि तिला गरोदर केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.