हिवरा बाजार येथील अपघातात जख्मी तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू ; मृतांची संख्या पोहचली 2 वर
Ramtek, Nagpur | Nov 14, 2026 पो. स्टे. देवलापार अंतर्गत हिवरा बाजार येथे भरधाव दुचाकीने पायी जात असलेल्या रामगोपाल लाडे वय 55 वर्ष रा. हिवरा बाजार याचा एमएच 31 सी यू 3797 क्रमांकाच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात रामगोपाल याचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक शुभम व एस. मरस्कोल्हे हे दोघे जख्मी झाले होते. दोघे ही मेडिकल रुग्णालय नागपूर येथे उपचार घेत होते. यापैकी शुभम याचा उपचारा दरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या 2 झाली आहे.