काटोल: २०२३ पासून फरार असलेला पाहिजे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
Katol, Nagpur | Oct 6, 2026 माहितीनुसार नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०२३ पासून चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या पाहिजे आरोपीला कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेतले. प्रशांत राजेंद्र वानखेडे (वय २५ वर्षे, रा. रोहणा, ता. नरखेड, जि. नागपूर) असे आरोपीचे नाव असून, तो पोलीस स्टेशन काटोल येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात हवा होता.काटोल पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. ०६/२०२३ कलम ३७९, ३४ भादंवि अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.