बदनापूर: शहरातील नागरिकांनी चक्क बदनापूर नगरपंचायत च्या मुख्य प्रवेशद्वारावर आणून टाकला घाण कचरा, व्हिडिओ समोर
आज दि.8 ऑक्टोंबर 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर शहरातील नगरपंचायत कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काल दिनांक 7ऑक्टोबर2026रोजी प्रभाग क्रमांक 9 व 10 मधील स्थानिक रहिवाशांनी घाणकचऱ्याला त्रस्त होत चक्क ट्रॅक्टरवर कचरा प्रवेशदरावर आणून टाकला आहे यामध्ये त्यांनी मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या कामकाजाचा जाहीर निषेध केला असून कारण कित्येक महिन्यापासून आम्ही सांगत आहे की आमच्या परिसरात स्वच्छता करा ती न केल्यामुळे आम्ही हा कचरा आणून टाकला आहे.