रामटेक: गंगाभावनम, रामटेक येथे पदवीधर मतदार संघाचे भाजपा उमेदवार सुधाकर कोहळे यांची सभा संपन्न
Ramtek, Nagpur | Oct 16, 2026 आगामी 23 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा शिवसेना राकाँ चे अधिकृत उमेदवार भाजपाचे सुधाकर कोहळे यांची प्रचार सभा शुक्रवार दि. 16 ऑक्टोबरला सायं. 5 वाजता गंगा भवनम रामटेक येथे संपन्न झाली. यावेळी राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल, उमेदवार सुधाकर कोहळे,आमदार राजीव पोतदार, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, भाजपाध्यक्ष आनंदराव राऊत,राकाँचे जिल्हाध्यक्ष टाकसाळे, रामटेक विधानसभा राकां समन्वयक चंद्रपाल चौकसे प्रामुख्याने उपस्थित होते.