रामटेक: रामटेक येथे रास गरब्याची धूम; नेहरू मैदान रामटेक येथे रंगला रामटेक भगिनी मंडळाचा रास गरबा.
Ramtek, Nagpur | Oct 17, 2026 नवरात्रीच्या पर्वा वर रामटेक शहरातील नेहरु मैदानावर प्रत्येक दिवशी सायं. 7.30 ते रात्री 11 वाजता पर्यंत सुरु असलेल्या भव्य रास गरब्यात शहरातील बालगोपाल,युवक, युवती, महिला वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषेत येऊन गरब्याचा आनंद लुटत आहेत. रामटेक भगिनी मंडळाच्या वतीने हा भव्य रास गरबा आयोजित करण्यात आला आहे.