रामटेक: रामटेक न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिता लावून आंदोलन
Ramtek, Nagpur | Oct 17, 2026 समान काम,समान वेतन या तत्त्वानुसार सुधारित वेतन लागू करावे या मागणीसाठी दुय्यम न्यायालयात कार्यरत न्यायिक कर्मचाऱ्यांनी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोंबर व शनिवार दिनांक 17 ऑक्टोबरला काळ्यापिता लावून दिवसभर काम केले. नागपूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना नागपूर अंतर्गत कर्मचाऱ्यांनी हे निषेध आंदोलन केले.