अभिरुची अकॅडमी रामटेकचे खेळाडू चमकले; राष्ट्रीय अथलेटिक स्पर्धेसाठी पाच खेळाडूंची निवड
Ramtek, Nagpur | Oct 27, 2026 विदर्भ वनवासी कल्याण आश्रम राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत नागपूर ग्रामीणच्या खेळाडूंनी वर्चस्व प्रस्थापित करीत राष्ट्रीय स्पर्धेत धडक मारली आहे.आता हे खेळाडू ओडिसा येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरले आहेत. 27 ऑक्टोबरला युनिव्हर्सिटी सिंथेटिक मैदान नागपूर येथे राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत ग्रामीणचा डंका पिटला.