🚔 खाकी वर्दीचे स्वप्न… जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनातून साकार होणाऱ्या उज्ज्वल भविष्याची नवी दिशा! 🇮🇳
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानावर आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे साहेब यांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींशी संवाद साधत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. पोलीस दलात भरती होण्यासाठी आवश्यक असलेली शिस्त, सातत्यपूर्ण मेहनत, आत्मविश्वास, शारीरिक क्षमता आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थींना नवी ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळाले.
आमदार श्री. मंगेशदादा चव्हाण यांनीही उपस्थित राहून तरुणांना मार्गदर्शन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या शिबिरात मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा, आवश्यक कागदपत्रे तसेच भरती प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकूर, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती सह्याद्री बिर्ले, चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक श्री. अमितकुमार मनेळ, नगराध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण, उपनगराध्यक्ष श्री. हर्षल चौधरी यांच्यासह पदाधिकारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गुणवंत तरुण-तरुणींना योग्य मार्गदर्शन आणि पोलीस भरतीची समान संधी मिळावी, या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
तरुणाईच्या स्वप्नांना बळ, मेहनतीला योग्य दिशा आणि देशसेवेच्या ध्येयाला प्रेरणा!
सर्व प्रशिक्षणार्थींना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
जळगाव जिल्हा पोलीस दल 🚔
सदैव सेवेत, सदैव सुरक्षेसाठी!
#JalgaonPolice #PoliceRecruitment #PoliceTraining #Chalisgaon #जळगावजिल्हापोलीस #पोलीसभरती
2k views | Jalgaon, Maharashtra | Nov 1, 2026