मनसर येथे 52 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
Ramtek, Nagpur | Nov 13, 2026 पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या मनसर येथील वार्ड क्रमांक 2 चे रहिवासी दिलीप पिपरोल यांचे शव गळफासाला लटकलेले आढळल्याने एकच खळबळ उडाली. शुक्रवार दिनांक 13 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता चे दरम्यान त्याचे शव त्याचे घरी लटकलेल्या अवस्थेत मिळाले. माहितीप्रमाणे मृतक दिलीप हा आपल्या घरी एकटाच राहत होता. शेजारीच त्याचे नातलग राहत होते. मृतकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. रामटेक पोलीस अधिक तपास करीत आहेत. शुक्रवारला सकाळी दिलीप दिसला नसल्याने त्याचे नातलग त्याला उठविण्यास त्याचे घरी गेले असता तो गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला.