रामटेक: रामटेक तालुक्यातील नेरल्याच्या लापता इसमाचे शव भंडारा जिल्ह्यातील वरठी ला मिळाले; पोलिसांचा अधिक तपास सुरु
Ramtek, Nagpur | Oct 15, 2026 पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत नगरधन बीट मधील नेरला येथील रहिवाशी नाना नेवारे वय 53 वर्ष हा मागील 13 ऑक्टोबर पासून घरी कुणाला काहीही न सांगता निघून गेला होता. या दरम्यान त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र हाती काहीही लागू शकले नाही. पोलीस स्टेशन रामटेकला याची सूचना देण्यात आली. अखेर 14 ऑक्टोबरला सायंकाळी त्याचे शव भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे नहरात मिळाल्याची माहिती आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.