मोगरकसा जंगलात पुन्हा बघिराचे दर्शन ; पेंच अभयारण्यात दिसला ब्लॅक पॅंथर
Ramtek, Nagpur | Nov 13, 2026 पेंच अभयारण्यातील मोगरकसा जंगलात काही महिन्यांपूर्वी आढळलेला बघिरा अर्थात ब्लॅक पॅंथर मागील काही महिन्यांपासून बेपत्ता झाल्याची चर्चा वन्यजीव प्रेमी वर्तुळात सुरू असतानाच 12 नोव्हेंबरला या जंगलाचे आकर्षण ठरलेल्या ब्लॅक पॅंथरने पुन्हा दर्शन दिल्याने वन पर्यटकांसह गाईड, वन अधिकारी व वन कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मोगरकसा जंगल सफारी गेटमधून गेलेल्या तब्बल 10 सफारी जिप्सी मधील पर्यटकांना हा अविस्मरणीय क्षण टिपता आला आहे.