रामटेक वासियांनी दिवाळी, शोभायात्रा उत्सव पर्यावरण पूरक साजरा करावा; शोभायात्रा आयोजन पूर्वतयारी सभेत स्थानिकांना आवाहन
Ramtek, Nagpur | Oct 31, 2026 शनिवार दिनांक 31 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता रामाळेश्वर देवस्थान मंदिर परिसरात रामटेक येथे आगामी त्रिपुर कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित होणाऱ्या शोभायात्रे संदर्भात पूर्व नियोजन सभा घेण्यात आली. यात दुष्काळग्रस्त परिस्थिती व पर्यावरणाची हानी या दृष्टीने आगामी दिवाळी व शोभायात्रा उत्सव पर्यावरण पूरक साजरा करावा असे आवाहन राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी रामटेकवासीयांना केले. जनसेवा मंडळाचे अध्यक्ष तसेच सभेचे अध्यक्ष पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी आयोजनात सर्वांनी उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. तर जनसेवा मंडळाचे महासचिव तथा माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी शोभायात्रेदरम्यान सर्वांनी कमिटीचे नियम काटेकोरपणे पाळावे. जेणेकरून कुणालाही कुठलेही नुकसान होणार नाही. चलचित्र संचालकांनी झाकी वेळेवर व शिस्तीत काढण्याचे आवाहन केले. जुन्या तृट्या,नवीन उपाययोजना, पुरस्कार रकमेत वाढ, शोभायात्रा उत्सव अध्यक्ष निवड, विविध समिती प्रमुख निवड, अतिथी सेलिब्रिटी, वर्गणी गोळा करणे यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष बीकेंद्र महाजन, सहसचिव सुभाष बघेले,रुषी किंमतकर यांचे सहित पदाधिकारी उपस्थित होते.