भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त माजी आ. डी मल्लिकार्जुन रेड्डी यांचे विनम्र अभिवादन ; आदिवासी बहुल क्षेत्राचा केला दौरा
Ramtek, Nagpur | Nov 16, 2026 भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्ताने आदिवासी बहुलक्षेत्रातील प्रत्येक गावात आदिवासी बांधवां द्वारे रविवार दिनांक 14 नोव्हेंबरला जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भाजपाचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी मनसर सहित आदिवासी क्षेत्रातील गावांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी वडंबा, करवाही,लोधा,सितापार,पिंडकापार, बेलदा, उमरी, टूयापार, जुनेवाणी या आदिवासीबहुल गावात जाऊन येथे आयोजित बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमास भेट देऊन बिरसा मुंडा यांना अभिवादन केले व या गावातील नागरिक, शेतकरी, पशुपालकांशी प्रत्यक्ष संवाद साधून परिसरातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची टंचाई,पशुंसाठी चारापाण्याची उपलब्धता तसेच शेतकरी, सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं.सदस्य,पदाधिकारी यांच्याशी विस्तृत चर्चा केली.