रामटेक: एल निनोचा प्रभाव : रब्बी पिके धोक्यात ; धरणातून सिंचनासाठी पाणी नाही, पेंच पाटबंधारे विभागाचे जाहीर प्रकटन
Ramtek, Nagpur | Oct 22, 2026 एल निनो प्रभावामुळे खिंडसी, तोतलाडोह व नवेगाव खैरी धरणांमध्ये पाणि साठा कमी असल्याने रब्बी हंगाम 2026 - 27 करिता सिंचनासाठी पाणीपुरवठा उपलब्ध नसून शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड न करण्याबाबत जाहीर प्रकटन गुरुवार दिनांक 22 ऑक्टोबरला कार्यकारी अभियंता, पेंच पाटबंधारे विभाग नागपूर यांचे द्वारे सूचित करण्यात आल्याने यावर्षी रब्बी पिके धोक्यात आली आहेत.