महात्मा गांधी’च्या वेशातील मुलाचे लाल झालेले डोळे पाहून प्रवाशांचा संताप; विक्रोळी स्टेशनवरील गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल!
विक्रोळी रेल्वे स्थानकावरील CSMT कडील पादचारी पुलावर महिला आपल्या तीन मुलांसह बसली होती; त्यापैकी मोठ्या मुलाला सिल्वर ऑइल पेंट लावून ‘महात्मा गांधी’च्या वेशात उभे करण्यात आले.
ऑइल पेंटमुळे मुलाचे डोळे लाल झाले होते आणि डोळ्यातून पाणी येत असल्याचे पाहून प्रवासी महिलांनी संताप व्यक्त केला.
मुलाला पाहून अनेक प्रवासी पैसे देत होते; मात्र मुलाची अवस्था लक्षात येताच काही महिलांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्या ठिकाणी गोंधळ घातला.
महिलांनी मुलाचा चेहरा स्वच्छ करून डोळे पुसले आणि त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
आईसोबत असलेल्या इतर दोन मुलांकडेही प्रवाशांचे लक्ष गेले; लहान मुलांना अशा प्रकारे भीक मागण्यासाठी उभे करण्याबाबत प्रवाशांनी चिंता व्यक्त केली.
स्नेहल कांबळे या महिला प्रवाशांनी संपूर्ण घटना सोशल मीडियावर मांडत प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
Kalyan, Thane | Sep 12, 2026