Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
बीजेपी
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
आग
Up
मध्यप्रदेश
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Cm
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
jilhavarta
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीहून भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे आणि कल्याण जिल्हा भाजपच्या वतीने कोकणवासीयांसाठी मोफत एसटी बसेस डोंबिवली मोठा गाव येथून भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब ,नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत बसेस कोकणात रवाना ,
Kalyan, Thane
| Sep 12, 2026
MORE NEWS
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण चे ACP अशोक होनमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण मध्ये पोलिसांचा रूट मार्च वपोनि महात्मा फुले पोलीस स्टेशन,१३ पोलीस अधिकारी, ७२ पोलीस अंमलदार, ३२ नवप्रविष्ट पोलिस अंमलदार, ४२ SRPF अंमलदार, २० होमगार्ड,०२ CRM मोबाईल, ०२ पीटर मोबाईल, ०२ बीट मार्शल सहभागी
Kalyan, Thane | Sep 12, 2026
महात्मा गांधी’च्या वेशातील मुलाचे लाल झालेले डोळे पाहून प्रवाशांचा संताप; विक्रोळी स्टेशनवरील गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल! विक्रोळी रेल्वे स्थानकावरील CSMT कडील पादचारी पुलावर महिला आपल्या तीन मुलांसह बसली होती; त्यापैकी मोठ्या मुलाला सिल्वर ऑइल पेंट लावून ‘महात्मा गांधी’च्या वेशात उभे करण्यात आले. ऑइल पेंटमुळे मुलाचे डोळे लाल झाले होते आणि डोळ्यातून पाणी येत असल्याचे पाहून प्रवासी महिलांनी संताप व्यक्त केला. मुलाला पाहून अनेक प्रवासी पैसे देत होते; मात्र मुलाची अवस्था लक्षात येताच काही महिलांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्या ठिकाणी गोंधळ घातला. महिलांनी मुलाचा चेहरा स्वच्छ करून डोळे पुसले आणि त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आईसोबत असलेल्या इतर दोन मुलांकडेही प्रवाशांचे लक्ष गेले; लहान मुलांना अशा प्रकारे भीक मागण्यासाठी उभे करण्याबाबत प्रवाशांनी चिंता व्यक्त केली. स्नेहल कांबळे या महिला प्रवाशांनी संपूर्ण घटना सोशल मीडियावर मांडत प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
Kalyan, Thane | Sep 12, 2026
कल्याण पूर्व गावदेवी रोड वर कृत्रिम तलावाची शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी केली पाहणी ,तलाव गणेश विसर्जनासाठी सज्ज ,यंदा 10 फुटांची मूर्ती या तलावात विसर्जन करता येणार ,मातोश्री गुंजाई फाउंडेशनतर्फे प्रसादाचे नियोजन ..
Kalyan, Thane | Sep 12, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर हर्षाली थविल-चौधरींचा गणेशघाटांचा पाहणी दौरा,गणेशभक्तांना गैरसोय होऊ नये यासाठी सुविधांचा घेतला आढावा गणेशभक्तांच्या सुविधांसाठी महापालिका सज्ज बाप्पाचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे महापौर हर्षाली थविल चौधरी यांचे आवाहन कल्याण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून गणेशभक्तांसाठी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेण्यात आला. महापौर हर्षाली थविल-चौधरी यांनी महापालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत विविध गणेशघाट आणि विसर्जनस्थळांची पाहणी केली. मोठागाव गणेशघाट, कुंभारखानपाडा गणेशघाट, चोळेगाव तलाव, नांदिवली तलाव तसेच दुर्गाडी गणेशघाट या ठिकाणी महापौर हर्षाली थविल-चौधरी यांनी पाहणी दौरा केला. यावेळी गणेशमूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले
Kalyan, Thane | Sep 12, 2026
एक्सप्रेस गाडीमधून गांजाची तस्करी कल्याण GRP ने महानगरी एक्सप्रेसमधून २७ किलो ३८० ग्रॅम गांजा केला जप्त ,पळून गेलेला गांजा तस्कर मुख्तार उर्फ गुड्डू शेख याला सोलापूरच्या अक्कलकोटमधून अटक ओडिशाहून मुंबईत गांजा आणल्याचा उलगडा; भिवंडीतील साथीदार समीर अन्सारी अजूनही फरार, GRP कडून शोध सुरू पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी कल्याण रेल्वे स्थानकावर गांजाच्या बॅगा सोडून काढला होता पळ
Kalyan, Thane | Sep 12, 2026
नारायणी इव्हेंट्स प्रस्तुत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर SHOPING DHAMAKA ! गणेशउत्सव शॉपिंग एक्झिबिशन २०२६ यंदाच्या गणेशोत्सवासाठी खास खरेदीचा आनंद घ्या एका छताखाली! स्थळ - लोहाना महाजनवाडी हॉल,आग्रा रोड ,कल्याण पश्चिम १०,११,१२ आणि १३ सप्टेंबर सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई येथून १०० हून अधिक ब्रँड्सचे आकर्षक स्टॉल्स!
Kalyan, Thane | Sep 12, 2026
बालक मंदिर प्राथमिक शाळेत गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा ४७५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कल्याण : हिंदू धर्मात सर्वप्रथम पूजनीय देवता भगवान गणेश आहेत. गणपती हे गणांच्या सर्व वर्गांमध्ये सर्वोच्च मानले जातात. अशा ६४ कलांचे अधिपती असलेल्या गणरायाची मूर्ती बनवण्याची कार्यशाळा दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी बालक मंदिर संस्था, प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेसाठी शारदा मंदिर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा हर्षे उपस्थित होत्या. गणपतीचे गाणे ऐकवून त्यांनी कार्यशाळेची सुरुवात केली. यावेळी शारदा मंदिर शाळेतील विद्यार्थी देवांश आव्हाड व अंश शहा यांनी विद्यार्थ्यांना गणरायाची मूर्ती कशी घडवावी, याचे उत्तम मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या नाजूक हातांनी गणरायाच्या सुंदर मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमात शाळेतील तब्बल ४७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमातील पाहुण्यांची ओळख भालचंद्र घाटे यांनी करून दिली, तर शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका विद्या घुले यांनी स्वागत केले. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार व शालेय समिती अध्यक्ष दीपक परब यांनी सुचवलेल्या विषयानुसार कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची उत्तम तयारी करून घेतली. वरिष्ठ शिक्षिका विद्या घुले यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. गणेशमूर्ती निर्मितीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्यात सर्जनशीलतेची भावना निर्माण झाली.
Kalyan, Thane | Sep 12, 2026
कोट्यवधींचा कचरा ठेका, तरी स्टेशनबाहेर कचऱ्याचे ढीग!सुमित एल्को कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह डोंबिवली स्टेशन परिसरात सुमित एल्कोच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह;भर मार्केट मध्ये चौकात साचवला जातोय कचरा ,कचरा उचलण्यासाठी अडीच तासांचा विलंब? डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून शहरातील कचरा संकलनासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना डोंबिवली स्टेशन परिसरातील एका व्हिडिओमुळे कचरा व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या सुमित एल्को कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून स्टेशनबाहेरील मार्केट परिसरातच मोठ्या प्रमाणात कचरा जमा केला जात असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. डोंबिवली स्टेशनबाहेरील भर चौकात कचरा एकत्र केल्यानंतर तो तात्काळ उचलला जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जवळपास दोन ते अडीच तास कचरा त्याच ठिकाणी पडून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होते. डोंबिवली स्टेशन परिसर हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. सकाळच्या वेळेत कामानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक या परिसरातून ये-जा करतात. मात्र, रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना नाक मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात मोठ्या संख्येने भाजी विक्रेते आणि छोटे व्यावसायिक व्यवसाय करतात. कचरा बराच वेळ त्याच ठिकाणी पडून राहिल्याने या विक्रेत्यांनाही अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिका शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मोठा निधी खर्च करत असताना, कचरा संकलन झाल्यानंतर तो तात्काळ उचलला का जात नाही?, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Kalyan, Thane | Sep 12, 2026