Public App Logo
Profile Picture

Jilha Varta (जिल्हा वार्ता)

@jilhavarta
235Followers
0Following
शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांचं आवाहन

माझा वाढदिवस यंदा माझ्यासाठी नाही… तर आपल्या अन्नदात्यासाठी!

माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर, होर्डिंग्ज किंवा जाहिराती लावण्याऐवजी त्यासाठी होणारा खर्च एखाद्या गरजू शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी द्या ....

कल्याण : आपल्या महाराष्ट्राचा पोशिंदा असलेला शेतकरी आज विविध संकटांना सामोरा जात आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि संघर्षाला हातभार लागावा, या उद्देशाने शिवसेना संपर्क प्रमुख महेश गुंजाई दशरथ गायकवाड यांनी यंदाचा आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला आहे.

९ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापूर येथे गरजू व संकटग्रस्त शेतकरी बांधवांसोबत त्यांना मदतीचा हात देत वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.यासाठी महेश गायकवाड यांनी आपल्या सर्व हितचिंतकांना, मित्रपरिवाराला आणि शुभेच्छुकांना विशेष आवाहन केले आहे. वाढदिवशी आपल्या कार्यालयात किंवा घरी शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये, तसेच वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर, होर्डिंग्ज अथवा जाहिराती लावू नयेत, असे त्यांनी म्हटले आहे.
त्याऐवजी या जाहिरातींसाठी होणारा खर्च एखाद्या गरजू शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी द्यावा, अशी त्यांनी विनंती केली आहे.

“तुमच्या शुभेच्छांपेक्षा एखाद्या शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर आलेले समाधानाचे हास्य आणि त्यांच्या आशीर्वादातच मला खरा आनंद मिळेल,” अशी भावना महेश गायकवाड यांनी व्यक्त केली.

वाढदिवसाचा खर्च सत्कारणी लागावा आणि शुभेच्छांचा मान शेतकऱ्यांच्या मदतीतून राखला जावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या आशीर्वादातून मिळणारे समाधान हेच आपल्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट असल्याचे त्यांनी या आवाहनातून स्पष्ट केले आहे.
बडोदरा महामार्गामुळे कल्याण जवळील बल्याणी गावाची कोंडी; विकासकामे ठप्प!
DP रस्ते, आरक्षित भूखंड आणि नाल्यांचे नैसर्गिक स्रोत बाधित; ग्रामस्थ आक्रमक, “समस्या सुटेपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होऊ देणार नाही”
कल्याण : बडोदरा महामार्गाच्या कामामुळे बल्याणी गावातील विविध विकासकामे आणि नागरी सुविधांवर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील DP रस्ते, आरक्षित भूखंड तसेच नाल्यांचे नैसर्गिक जलस्रोत बाधित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उमेश बोरगावकर यांच्यासह तेजश्री गायकवाड, राहुल कोट आणि ग्रामस्थांनी बल्याणी गावातील बाधित भागाची पाहणी केली.
महामार्गाच्या कामामुळे गावातील नियोजित विकासकामांना अडथळा निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांनी पाहणीदरम्यान निदर्शनास आणून दिले. तसेच नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यास भविष्यात पावसाळ्यात पाणी साचणे आणि पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
गावातील DP रस्ते आणि आरक्षित भूखंडांचा प्रश्न मार्गी लावावा, नाल्यांचे नैसर्गिक स्रोत पूर्ववत करावेत आणि स्थानिकांच्या समस्या सोडवूनच महामार्गाचे काम पुढे न्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“बल्याणी गावातील नागरिकांच्या समस्या सुटेपर्यंत बडोदरा महामार्गाचे काम पूर्ण होऊ देणार नाही,” असा इशारा उमेश बोरगावकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत असलेली व्हेल माशाची उलटी विक्री करणारे दोघे ठाणे पोलिसांच्या ताब्यात

२ किलो ६२० ग्रॅम अंबरग्रीस जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे २ कोटी ७२ लाख रुपये किंमत

ठाणे : आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असलेल्या आणि कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची (Ambergris) विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ किलो ६२० ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त केले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत २ कोटी ७२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे येथील पोलिसांना मिळालेल्या बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ ऑक्टोबर  रोजी रात्रीच्या सुमारास  ठाणे पश्चिमेतील जांभळी नाका परिसरातील हायलँड रेसिडेन्सी लॉजजवळ पोलिसांनी सापळा रचला.यावेळी मयूर विश्वास पाटील (रा. कोल्हापूर) आणि मिनाद्री मधुकर मोहिते (रा. सिंधुदुर्ग) हे दोघे संशयास्पदरीत्या आढळून आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे २ किलो ६२० ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी (Ambergris) आढळून आली.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत अंबरग्रीसला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असल्याचे समोर आले. त्यापासून उच्च दर्जाचे अत्तर तसेच सुगंधी द्रव्ये तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत मोठी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.जप्त करण्यात आलेले अंबरग्रीस हे वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत संरक्षित असून, ते विनापरवाना बाळगणे व विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात ठेवणे बेकायदेशीर आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२२/२०२६ अन्वये वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील कलम ३९, ४४, ४८, ४९(ब), ५७, ५१ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा, घटक-९, ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक सुभाष मोरे करीत आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील बेकायदेशीर होर्डिंग्जवर ‘हातोडा’ कधी?; सामाजिक कार्यकर्ते दिनेश कुमावत यांचे प्रशासनाला निवेदन

शहराचे विद्रुपीकरण थांबवा! बेकायदेशीर जाहिरात फलक तातडीने हटवून प्रिंटर, कंत्राटदार आणि जाहिरात एजन्सींवर कारवाईची मागणी

कल्याण-डोंबिवली : शहरातील वाढत्या बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि जाहिरात फलकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ऐतिहासिक कल्याण शहराचा चेहराच नियमबाह्य जाहिरात फलकांमुळे विद्रूप होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते दिनेश कुमावत यांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात कुमावत यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे निवेदन सादर केले आहे. बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणारे प्रिंटर, कंत्राटदार, जाहिरात एजन्सी तसेच संबंधित जाहिराती प्रदर्शित करणाऱ्यांवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा, १९९५ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी �
कल्याण जवळील उसाटने मैदानात बिनजोड छकड्यांच्या भव्य जंगी शर्यतींचा थरार; शिवसेना संपर्क प्रमुख ,नगरसेवक महेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन!
भाजप कल्याण ग्रामीण मंडळ 1 अध्यक्ष नगरसेवक ऍड मंदार टावरे यांच्यातर्फे सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सेवा ज्योती या कार्यक्रमानिमित्त भव्य बाईक रॅली

भाजपा कल्याण ग्रामीण मंडळ-१ कार्यालय → दत्तानगर → १५० तिरंगा चौक → पाथरली गोदेवी मंदिर → आईस फॅक्टरी → DNS बँक, सोनारपाडा → पाटीदार हॉल, दावडी पर्यंत बाईक रॅली चे आयोजन
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन; दोन हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन, रवी पाटील फाउंडेशन आणि एस जी एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन आचार्य अत्रे रंगायतन, कल्याण येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला कल्याण पश्चिम परिसरातील विविध शाळांमधून जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि करिअरच्या विविध संधींबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कल्याण पश्चिम परिसरातील पाच हजारांहून अधिक विद्यार्थी या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी उत्सुक होते. मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बंदिस्त सभागृहात कार्यक्रम घेणे आवश्यक असल्याने उपलब्ध जागेनुसार विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना करिअर निवड, भविष्यातील संधी तसेच विविध क्षेत्रांतील आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले. संबंधित तज्ज्ञांनी आतापर्यंत देशभरातील सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांना आणि पन्नास हजार पालकांना मार्गदर्शन केल्याची माहिती आयोजकांनी दिली.

विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक करिअरकडे न पाहता आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार योग्य क्षेत्राची निवड करावी. भविष्यात कल्याण शहरातील विद्यार्थी आयएएस, आयपीएस, डॉक्टर, वकील, इंजिनिअर यांसह विविध क्षेत्रांमध्ये मोठे यश मिळवावेत, यासाठी अशा मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने केले जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
विरार-अलिबाग कॉरिडॉरविरोधात भूमिपुत्रांचा एल्गार! खारबांव नाक्यावर ‘रस्ता रोको’; १४ गावांतील शेतकऱ्यांचा न्यायासाठी आक्रोश

“योग्य मोबदला आणि पुनर्वसन मिळालेच पाहिजे!” शेतजमीन, घरं आणि रोजगार वाचवण्यासाठी भूमिपुत्रांची एकजूट; विकासाच्या नावाखाली बळी देण्यास तीव्र विरोध

विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या १४ गावांतील भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांचे सुपुत्र सुमित म्हात्रे यांच्यासह  मोठ्या संख्येने स्थानिक भूमिपुत्र आणि शेतकरी सहभागी झाले होते.
या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, घरं आणि रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. बाधितांना योग्य मोबदला, पुनर्वसन आणि न्याय्य हक्क मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी स्पष्ट केले की, “आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिक नागरिकांचा बळी देणे योग्य नाही.”
खारबांव नाका येथे समस्त भूमिपुत्र मोठ्या संख्येने एकत्र आल्याने आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पातील १४ गावांतील शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
पाच तासांत वॉल लीक! महापालिकेच्या चुकीची शिक्षा नागरिकांनी का भोगायची?नागरिकांचा संतप्त सवाल

KDMCच्या निकृष्ट दुरुस्तीवर नागरिक संतप्त;  पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्ता रोको करू - शिवसेनेचा इशारा

कल्याण पूर्व : जय भवानी नगर, चिंचपाडा येथील शिवम कॉम्प्लेक्सजवळील पाण्याच्या वॉलची KDMCच्या मेंटेनन्स विभागाकडून दुरुस्ती करून अवघे पाच तास उलटत नाहीत तोच पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू झाली आहे. त्यामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

यापूर्वी या वॉलमधून गळती होत असल्याची तक्रार केल्यानंतर दुरुस्तीसाठी तब्बल दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. नागरिकांनी सहकार्य करत हा त्रास सहन केला. मात्र दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर काही तासांतच पुन्हा गळती सुरू झाल्याने “आम्ही तुमच्या चुकीची शिक्षा किती वेळा भोगायची?” असा संतप्त सवाल शिवसेना कार्यकर्ते  दुर्गेश बागुल �
ज्येष्ठांचे आशीर्वाद... जीवन जगण्याची नवी ऊर्जा!

कल्याण पूर्व आमदार सुलभा गायकवाड यांची 
सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आंभे येथील 'जाणीव' वृद्धाश्रमाला भेट; ज्येष्ठांशी साधला मनमोकळा संवाद
जिजाऊ संस्थेचा कोकणात ३५ लाख मोफत वह्या वाटपाचा संकल्प;
अंबरनाथ विभागात जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण

कल्याण पूर्व ग्रामीण भागात 
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र व जिजाऊ संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा संपूर्ण कोकणात ३५ लाख मोफत वह्या वाटपाचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत कल्याण पूर्व/ अंबरनाथ ग्रामीण विभागात विविध जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
जिजाऊ संस्थेचे संस्थापक तथा ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक  निलेश भगवान सांबरे  यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्यापक सामाजिक उपक्रम राबवला जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये, या उद्देशाने  वह्यांचे वाटप केले जाते.
अंबरनाथ विभागातील नियोजित कार्यक्रमानुसार:
सकाळी १०.३० वाजता: जि.प. शाळा पोसरी येथे वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
सकाळी ११.४५ वाजता: जि.प. शाळा कुंभार्ली येथे विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या.
या व्यतिरिक्त  वाडी, जि.प. शाळा न्हारेन, जि.प. शाळा पाली, जि.प. शाळा चिरड आणि जि.प. शाळा शेलारपाडा या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप उत्साहात पार पडले. वह्या मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
या प्रसंगी जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी ॲड. अक्षय काठवले,नेताजी दाभणे, उपसरपंच  विजय काठवले आणि पत्रकार संदेश दाभणे यांच्यासह शाळांचे शिक्षक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
दिल्लीत आंदोलनादरम्यान राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस आक्रमक

कल्याण मध्ये उमटले पडसाद

निवडणूक आयोग ही प्रायव्हेट लिमिटेड संस्था ,,भाजपचा आणि त्यांचे साटेलोटे,
ज्ञानेश कुमार हा भाजपचा दलाल, हेच याच्यावरून स्पष्ट होतंय

राहुल गांधींना ताब्यात घेणं ही लोकशाहीची हत्या

कल्याण डोंबिवली युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग यांचा आरोप

जपजीत सिंग यांचा रेल रोको करण्याचा प्रयत्न , पोलिसांनी घेतलं आधीच ताब्यात
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील धक्कादायक घटना
हॉटेल चालकाने दुचाकीवर बसलेल्या तरुणाला हटकले,मोबाईल दुकानचालक हॉटेल चालकामध्ये वाद,
मोबाईल दुकाचालक आणि साथीदारांनी हॉटेल चालकाला शिवीगाळ करत हॉटेलमधील कर्मचाऱ्याला केली मारहाण ,घटना CCTV मध्ये कैद ..महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या परस्पर विरोधी तक्रारी दाखल ,पोलीस तपास सुरू 

कल्याण :- कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्वामी समर्थ हॉटेल समोर राफी नावाचा तरुण हॉटेल चालक विजय सुर्वे यांच्या दुचाकीवर बसला होता . सुर्वे यांनी त्याला हटकले , गाडीवर बसू नको असे सांगितले असता त्याने सुर्वे यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली . रफी याने सुर्वे यांची कॉलर पकडली असता हॉटेलचा कर्मचारी मध्यस्थी करण्यात आला त्याला देखील राफी आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केल्याचा आरोप सुर्वे यांनी केला आहे. ती संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे .याप्रकरणी सुर्व�
अंबिवलीतील यशोदीप विद्यालयात नेमबाजी प्रशिक्षण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंची पहिल्याच वर्षी डीएसओ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये भारताची वाढती कामगिरी पाहता नेमबाजीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. ग्रामीण व उपनगरी भागातील होतकरू खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने मोहोने येथील छत्रपती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने अंबिवली, मोहोने व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ओपन साइट एअर रायफल शूटिंग अकादमी सुरू करण्यात आली आहे. यशोदीप विद्यालय येथे श्री विघ्नहर शिक्षण प्रसारक मंडळ व छत्रपती क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत सुरू असलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रशिक्षक आकाश जनार्दन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना नेमबाजीचे तांत्रिक प्रशिक्षण देतानाच शिस्त, एकाग्रता, सुरक्षितता, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. आधुनिक प्रशिक्षण पद्धतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नियमित सराव करून घेतला जात आहे.
छत्रपती स्पोर्ट्स क्लबच्या स्थापनेच्या पहिल्याच वर्षी खेळाडूंनी डीएसओ शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हर्षिता सिंगल हिने कांस्यपदक, रणवीर गायकवाड याने रौप्यपदक तर जतिन माधवी याने कांस्यपदक पटकावले. या तिन्ही खेळाडूंनी तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
या यशामुळे अंबिवली, मोहोने आणि परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये नेमबाजी या ऑलिम्पिक क्रीडा प्रकाराबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, पालकांकडूनही या उपक्रमाला प्रोत्साहन मिळत आहे.
यावेळी प्रशिक्षक आकाश काळे म्हणाले, “प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये क्षमता असते. योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य दिशा मिळाल्यास ग्रामीण व उपनगरी भागातील खेळाडूदेखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करू शकतात. छत्रपती स्पोर्ट्स क्लबचा उद्देश केवळ पदकविजेते घडवणे नसून शिस्तबद्ध, आत्मविश्वासू आणि सक्षम खेळाडू घडवणे हा आहे.”
छत्रपती स्पोर्ट्स क्लबच्या या उपक्रमामुळे परिसरातील होतकरू खेळाडूंना घराजवळच दर्जेदार नेमबाजी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. पहिल्याच वर्षी मिळालेले यश हे भविष्यातील मोठ्या कामगिरीची नांदी ठरत असून, या उपक्रमामुळे परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वीकृत नगरसेवक निवडीबाबत विलंब होत असल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक

सत्ताधाऱ्यांकडून स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्तीसाठी चालढकल

सत्ताधाऱ्यांमधील वाद विवाद आणि संभ्रमामुळे नियुक्तांना विलंब

येत्या महासभेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्ती झाल्या नाही तर न्यायालयात जाणार
डिजिटल अरेस्ट आणि पेन्शन फसवणुकीविरुद्ध वासिंद पोलिसांचे कवच

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सायबर जनजागृती कार्यक्रम

 डिजिटल अरेस्ट, पेन्शन फसवणूक तसेच ऑनलाइन आर्थिक गैरव्यवहाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वासिंद पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

सायबर गुन्हेगारांकडून बँक अधिकारी असल्याचे भासवून ओटीपी किंवा केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक केली जाते. तसेच व्हॉट्सॲपवर मुलगा किंवा नातेवाईक अडचणीत असल्याचे सांगून पैशांची मागणी करणे, ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून मानसिक दबाव निर्माण करणे, लॉटरी किंवा केबीसीमध्ये बक्षीस लागल्याचे आमिष दाखवणे, अनोळखी एपीके फाईल डाऊनलोड करण्यास भाग पाडणे आणि कॅप्चा भरून घरबसल्या पैसे कमावण्याचे प्रलोभन देणे, अशा विविध सायबर फसवणुकीच्या प्रकारांची माहिती यावेळी देण्यात आली.

पोलिसांनी नागरिकांना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा अन्य गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असा सल्ला दिला. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच संशयास्पद एपीके फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नये. संशयास्पद फोन आल्यास घाबरून न जाता संभाषण तात्काळ थांबवून फोन बंद करावा आणि पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

सायबर फसवणूक झाल्यास सुरुवातीचा ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विलंब न करता १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच अधिकृत सायबर तक्रार प्रणालीद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले.

ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल आणि शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. वासिंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सायबर फसवणुकीला बळी पडल्यास तात्काळ १९३० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन वासिंद पोलिसांकडून करण्यात आले आहे.
कल्याण चिकणघरच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी शिवसेना शाखा प्रमुख चेतन म्हामूनकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा!

९ मीटरचा डी.पी. रस्ता प्रत्यक्षात ५ ते ६ मीटरवर; अनधिकृत अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरणाची मागणी

कल्याण : चिकणघर विभागातील किसन हाईट्स (म्हसोबा रिक्षा स्टॅन्ड) ते नामदेव विहार (मंगेशी वर्ल्ड) या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ९ मीटर मंजूर असलेला डी.पी. रस्ता प्रत्यक्षात केवळ ५ ते ६ मीटरपर्यंतच उपलब्ध असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शाखाप्रमुख चेतन  म्हामुणकर यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना स्मरणपत्र देत रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरणाची मागणी केली आहे.
स्मरणपत्रात म्हटले आहे की, या रस्त्याच्या पुढे मोठ्या गृहसंकुलांसह मंगेशी एलाइट आणि मंगेशी वर्ल्ड
डोंबिवली टिळकनगर,पाथर्ली,अंबिकानगर आणि गोग्रासवाडी परिसरात ,घनकचरा व्यवस्थापनेचा
 बोजवारा ,

उपायुक्त रामदास कोकरे यांची सरप्राईज व्हिजिट , सुमित एलकोच्या कामाची पोलखोल करत कंपनीला  कामकाज सुधारण्यासाठी दिला 48 तासांचा अल्टिमेटम

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील  टिळकनगर,पाथर्ली,अंबिकानगर आणि गोग्रासवाडी परिसरात गेल्या सात-आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या घनकचऱ्याच्या गंभीर प्रश्नाची आज महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांच्या सरप्राईज व्हिजिट करत  प्रत्यक्ष पाहणी केली.या प्रभागात कचरा संकलन व साफसफाईचे काम सुमित एलको कंपनीकडे देण्यात आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कंपनीकडून अपेक्षित पद्धतीने काम होत नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती. कंपनीचे कर्मचारी गणवेशात नसणे, कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन नसणे तसेच कोणत्य�
पोलीसाच्या वर्दीतला ‘देवदूत’! कर्तव्य बजावताना माणुसकीचा हात; पोलीस कर्मचारी गौतम जाधव यांचा नागरिकांसह रिक्षा चालकांकडून सत्कार!

छातीत वेदना झालेल्या दुचाकीस्वाराला प्रसंगावधान राखत तत्काळ CPR; वेळेत रुग्णालयात दाखल करून वाचवण्यासाठी जाधव यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक

कल्याण : कल्याण-शीळफाटा मार्गावर खोनी पलावा दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला अचानक छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. यावेळी कर्तव्यावर असलेल्या कोळशेवाडी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी गौतम जाधव यांनी प्रसंगावधान राखत तातडीने धाव घेतली आणि दुचाकीस्वाराला CPR देत प्राथमिक मदत केली.
यानंतर वेळ न दवडता संबंधित दुचाकीस्वाराला पुढील उपचारासाठी पलावा येथील जीवनदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.गौतम जाधव यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे दुचाक
KDMC ला ७२ पत्रं दिली, तक्रारींचा ढीग तरी एका पत्रावरही कारवाई नाही! ७२ पत्रांनंतरही दखल नाही; श्रीनिवास घाणेकर यांनी KDMC चा निषेध नोंदवत KDMC मुख्यालयात केले ठिय्या आंदोलन
फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला ब्लॅकमेल; तरुणाला बेड्या!

मानपाडा पोलिसांची कारवाई; तक्रारीनंतर कुणाल शिंगाडे पोलिसांच्या ताब्यात

डोंबिवली : फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला सातत्याने ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल शिंगाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 कुणाल शिंगाडे हा डोंबिवलीतील शिरढोण परिसरात राहत असून त्याची संबंधित विवाहितेशी ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने विवाहितेला तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.धमकी देत आरोपीकडून विवाहितेला सातत्याने ब्लॅकमेल केले जात होते. या प्रकाराला कंटाळून अखेर विवाहितेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीची दखल घेत मानपाडा पोलिसांनी  गुन्हा दाखल करून कुणाल शिंगाडे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस क�
लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीची १४वी डोंबिवली टॅलेंट हंट स्पर्धा उत्साहात संपन्न

डोंबिवली : थोर शिक्षणतज्ञ स्व. सुरेंद्र बाजपेयी सर यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ‘डोंबिवली टॅलेंट हंट’ स्पर्धा यंदा १४व्या वर्षात दिमाखात पार पडली. रविवार, ४ ऑक्टोबर रोजी ओंकार इंटरनॅशनल स्कूल, ठाकुर्ली येथे स्पर्धेची अंतिम फेरी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

यंदाच्या स्पर्धेत डोंबिवली परिसरातील ६० हून अधिक शाळांमधील सुमारे ४४ हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत सहभाग घेतला. त्यातून दुसऱ्या फेरीसाठी १ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, तर अंतिम फेरीसाठी ५० स्पर्धकांची निवड करण्यात आली.

अंतिम फेरीदरम्यान विविध सत्रे आणि फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि प्रतिभेची कसोटी घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ॲड. संपदा कुलकर्णी, डॉ. रौनकलक्ष्मी शिरसाट-तळेले, सीए हिमांशू जोशी आणि इंजिनिअर प्रसाद नाटेकर यांनी जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ डोंबिवली जिमखाना येथे आयोजित करण्यात आला. यावेळी लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र शाह, आमदार राजेश मोरे, माधव जोशी, दर्शन सामंत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संदेशाद्वारे सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमाला डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि फेडरल बँक यांचे प्रायोजकत्व लाभले. क्लब अध्यक्ष लायन नित्यानंद पोवार, प्रकल्प प्रमुख लायन अतुल चक्रदेव तसेच लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळे यंदाची डोंबिवली टॅलेंट हंट स्पर्धा गेल्या १४ वर्षांतील सर्वात यशस्वी उपक्रम ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, आत्मविश्वास आणि विविध कौशल्यांचा विकास घडवून आणण्यासाठी ‘डोंबिवली टॅलेंट हंट’ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कल्याणच्या भावार्थ दौंड यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार, भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे आणि भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भावार्थ भागवत दौंड यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाने सोपविलेल्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांना संघटित करणे, युवकांमध्ये राष्ट्रहिताची भावना रुजविणे, केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ युवकांपर्यंत पोहोचविणे तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासाठी भावार्थ दौंड कार्यरत राहतील.

भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा प्रसार, युवा नेतृत्वाची जडणघडण, युवकांचे प्रश्न शासनदरबारी मांडणे आणि युवकांना सामाजिक व राजकीय प्रवाहात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करणे, या उद्दिष्टांसाठी ते विशेष प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.या नियुक्तीमुळे भाजपा युवा मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल आणि महाराष्ट्रातील युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल भावार्थ दौंड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले असून, पक्षाने सोपविलेली जबाबदारी निष्ठेने, समर्पणाने आणि पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कल्याण दुर्गाडीचे कोनगाव पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी...
आदिवासी बांधवांना शासकीय योजनांची माहिती अन् लाभाचे वितरण

ठाणे : आदिवासी विकास विभागाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत आदिवासी बांधवांसाठी विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती, मार्गदर्शन तसेच पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला आदिवासी विकास विभाग, ठाणेचे अपर आयुक्त गोपीचंद कदम (भा.प्र.से.) यांची प्रमुख उपस्थिती होती. शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, प्रकल्प अधिकारी अरविंद जाधव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे, सहाय्यक लेखाधिकारी विजय कोरडे यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार आणि आर्थिक उन्नतीसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबाबत लाभार्थ्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले.

शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवून आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधणे, हा ‘सेवा संकल्प अभियानाचा’ मुख्य उद्देश आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, महिला, विद्यार्थी आणि लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.