गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर हर्षाली थविल-चौधरींचा गणेशघाटांचा पाहणी दौरा,गणेशभक्तांना गैरसोय होऊ नये यासाठी सुविधांचा घेतला आढावा
गणेशभक्तांच्या सुविधांसाठी महापालिका सज्ज
बाप्पाचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे
महापौर हर्षाली थविल चौधरी यांचे आवाहन
कल्याण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून गणेशभक्तांसाठी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेण्यात आला. महापौर हर्षाली थविल-चौधरी यांनी महापालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत विविध गणेशघाट आणि विसर्जनस्थळांची पाहणी केली.
मोठागाव गणेशघाट, कुंभारखानपाडा गणेशघाट, चोळेगाव तलाव, नांदिवली तलाव तसेच दुर्गाडी गणेशघाट या ठिकाणी महापौर हर्षाली थविल-चौधरी यांनी पाहणी दौरा केला. यावेळी गणेशमूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले
Kalyan, Thane | Sep 12, 2026