मंडई बघून रामटेकला परत येत असलेल्या दोघांचा चोरबावली शिवारात अपघातात मृत्यू
Ramtek, Nagpur | Nov 11, 2026 नागपूर- जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत येणाऱ्या चोरबावली शिवारात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत हिवराबाजार येथे मंडई बघून रामटेकला परत येत असलेल्या एका दुचाकी वरील तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा जखमी झाला असून त्याचेवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवार दिनांक 10 नोव्हेंबरला रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव सौरभ अनंतराव वाढीवे वय 12 वर्षे व अजय मधुकर कृपाले वय 29 वर्षे राहणार विनोबा भावे वार्ड, रामटेक असे आहे. तर जखमी युवकाचे नाव सुनील गजाम वय 32 वर्ष रा.विनोबा भावे वार्ड रामटेक असे आहे.