हिवरा बेंडे येथे आरटीओ चेक पोस्ट चुकवून अवजड वाहने सोडवण्यासाठी पैश्याची मागणी करणाऱ्यांकडून तरुणाला मारहाण
Ramtek, Nagpur | Oct 26, 2026 रामटेक तालुक्यातील कांद्री चेक पोस्ट चुकवून अवजड वाहने पुढे नेण्यासाठी पैशांची मागणी करीत ती न दिल्यास वाहन चालकांना मारण्याची व वाहनाची तोडफोड करण्याची धमकी देण्याच्या एका प्रकरणात रामटेक पोलिसांनी 25 ऑक्टोबरला रात्री तीन युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या ग्रामीण मार्गावर चेक पोस्ट व टोल चुकविण्यासाठी जड वाहने मोठ्या प्रमाणात चालवली जातात. याचा फायदा काही स्थानिक घेतात व अशा वाहनांकडून वसुली केली जात असल्याचा प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. यातच हा प्रकार घडला आहे.