रामटेक: नागपूर - लोधा होल्टिंग एसटी बस सेवा टूय्यापार मार्गे सुरु
Ramtek, Nagpur | Oct 25, 2026 रामटेक तालुक्यातील देवलापार क्षेत्रातील टुयापार गावातील नागरिकांनी नागपूर - लोधा हॉलटिंग एसटी बस सेवा टुयापार मार्गे सुरु करण्यासाठी राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्याकडे निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत ही बस सेवा दिनांक पंचेवीस ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आल्याने या परिसरातील नागरिकात हर्ष व्यक्त करण्यात येत आहे.